कळंबक्राईमस्थानिक बातम्या

कळंबात भीषण अपघात : मांजरा ट्रॅव्हल्सची धडक, पायी जाणाऱ्या विलास गंधुरे यांचा मृत्यू

अपघातानंतर चालक वाहनासह फरार, पत्नीच्या फिर्यादीवरून कळंब पोलिसांत गुन्हा नोंद

कळंब (प्रतिनिधी): कळंब शहरात येरमाळा–कळंब रस्त्यावर दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे भीषण अपघात घडला होता यात इंदीरा नगर येथील विलास लक्ष्मण गंधुरे (वय 47) यांचा मृत्यू झाला होता.

पहाटे साडेपाचच्या सुमारास विलास गंधुरे हे पायी चालत असताना सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर (PWD Office, कळंब) मांजरा ट्रॅव्हल्सची बस (MH-29-BE-9898) वेगाने व निष्काळजीपणे येऊन त्यांनी पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत गंधुरे गंभीर जखमी झाले व घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर बसचालकाने जखमीस उपचारासाठी न नेता, वाहनासह पळ काढला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून कळंब पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या घटनेबाबत मृताची पत्नी स्वाती विलास गंधुरे (वय 32, रा. इंदिरा नगर, कळंब) यांनी दि. 24 ऑगस्ट रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 281, 106(1), 184, 134(अ)(ब) व मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या कळंब पोलीस फरार चालकाचा शोध घेत असून तपास वेगाने सुरू आहे. या अपघातामुळे संपूर्ण इंदीरा नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!