धाराशिवराजकारणस्थानिक बातम्या

धाराशिव नगर परिषद : प्रभाग १ मध्ये अपक्ष आकाश सहाणे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – प्रभाग क्रमांक १ अ मधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले श्री. आकाश राम सहाणे यांनी काही तांत्रिक कारणास्तव अर्ज मागे घेता आला नसला तरी धाराशिवच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षच सक्षम आहे या दृढ विश्वासातून आज प्रभागातील भाजप उमेदवार श्री. स्वप्निल शिंगाडे यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला आहे.

सहाणे म्हणाले, “आपल्या प्रभागाचा तसेच संपूर्ण धाराशिव शहराचा सर्वांगीण विकास आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली फक्त भाजपच करू शकते,” आणि याच भूमिकेतून त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला.

धाराशिवच्या विकासाला साथ देत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल भाजपचे युवा नेते मल्हारदादा पाटील यांनी श्री. सहाणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्रभागातील प्रत्येक मतदारांना त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. स्वप्निल शिंगाडे व सौ. सुलभा प्रकाश पवार तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. नेहा राहुल काकडे यांना आपले बहुमोल मत देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये येण्याचा कार्यकर्त्यांचा ओढा कायम आहे. आता अपक्ष उमेदवाराने देखील भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचा विजय आणखीन सोपा झाला आहे.

यावेळी श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री.नितीन भोसले, श्री.राजाभाऊ पाटील, श्री.बालाजी गावडे, श्री.नाना कदम, श्री.प्रकाश पवार, श्री.बापू लोंढे, श्री.अमित पडवळ यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!