कळंब तालुका व शहर काँग्रेसची आढावा बैठक उत्साहात संपन्न
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
कळंब (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळंब तालुका व शहर काँग्रेसची आढावा बैठक येथे उत्साहात पार पडली. बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज भैय्या पाटील व जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुका अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी प्रमुख उपस्थिती लावून कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यांनी आगामी काळातील पक्षाच्या कार्यपद्धती, रणनीती व स्थानिक प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीत कळंब शहरातील अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून नव्या उर्जेची भर घातली. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
या बैठकीस तालुक्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. संपूर्ण वातावरण उत्साही आणि सकारात्मक होता.
