इनरव्हील क्लब ऑफ कळंबतर्फे मूकबधिर मुलींसाठी मेहंदी स्पर्धा
कळंब (प्रतिनिधी): रक्षाबंधन दिनानिमित्त येथील इनरव्हील क्लब ऑफ कळंब तर्फे संत ज्ञानेश्वर मूकबधिर विद्यालयात विशेष शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत मुलींनी अत्यंत सुंदर आणि आकर्षक मेहंदी काढून आपल्या कला सादर केल्या. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
- प्रथम – कु. हर्षदा भालेराव (इ. ६ वी)
- द्वितीय – कु. वैष्णवी पेटे (इ. ८ वी)
- तृतीय – कु. अमृता रंधवे (इ. ८ वी)

विजेत्यांना इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा बाळकृष्ण भवर (गांगर्डे) यांच्या हस्ते गुलाबपुष्प व शालेय साहित्याचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या आत्मनिर्भरतेस प्रोत्साहन देण्यासाठी व कलागुणांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी मुलीनी तयार केलेल्या राख्या खरेदी केल्या.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधवर, श्री. आश्रुबा कोठावळे, श्री. अडसूळ, सौ. सुनिता गुंड, सौ. कांबळे यांच्यासह शाळेचा सर्व स्टाफ, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच इनरव्हील क्लबच्या सचिव डॉ. दीपाली लोंढे, C.C. सौ. संगीता घुले, सौ. राजश्री देशमुख (डिस्ट्रिक्ट ३१३, झोनल ५ सब कोऑर्डिनेटर), प्रोजेक्ट चेअरमन डॉ. वर्षा जाधव, सौ. प्रफुलता मांडवकर, सौ. वेदिका जाधवर, डॉ. प्रियंका जाधवर, सौ. अंजली मोहेकर व सौ. मंगल डेंगळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रोजेक्ट चेअरमन डॉ. वर्षा जाधव यांनी मानले.
