कळंबस्थानिक बातम्या

कळंबमध्ये श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

कळंब (प्रतिनिधी): तालुक्यातील स्वकुल साळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

प्रारंभी गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मनोरंजन खेळांचे आयोजन झाले. तसेच स्वकुल साळी समाजाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

पुरस्कारप्राप्त व्यक्ती:-

  • प्रगतशील शेतकरी पुरस्कार – दिगंबर ठोंबरे
  • आदर्श शिक्षिका पुरस्कार – वृषाली तांबे
  • उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार – रंजन लिमकर
  • युवा उद्योजक पुरस्कार – विजय पोटे
  • समाजसेवा पुरस्कार – सागर महाद्वार

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेंद्र लटंगे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश जंत्रे, चंद्रकला पोटे, शिवाजी भाकरे, प्रा. डॉ. पंडित शिंदे, डॉ. अभिजित लोढे उपस्थित होते.

प्रा. डॉ. पंडित शिंदे यांनी “विद्यार्थ्यांना कसे घडवावे?” या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले. डॉ. अभिजित लोढे यांनी “समाज संघटन कसे करावे?” या विषयावर व्याख्यान दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश बर्वे, शैलेश लाटे, सागर महाद्वार, ज्ञानेश्वर ठोंबरे, संतोष लिमकर, प्रविण ठोंबरे, अभिजित डांगरे, संतोष ठोंबरे, मकरंद ठोंबरे, रवीराज इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!