कळंबस्थानिक बातम्या

संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालयात रक्षाबंधन उत्सव; स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीकडून वस्तू व खाऊ वाटप

कळंब (प्रतिनिधी): संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालयात स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील बहिणींनी भावंडांना राखी बांधून आपुलकी व्यक्त केली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू व विविध प्रकारचा खाऊ वाटप करण्यात आला.

स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे व त्यांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावणे हा आहे. कार्यक्रमास बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, संजय घुले, अरविंद शिंदे, शिवाजी सिरसाट, सतपाल बनसोडे, यश सुराणा, मनोज फल्ले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच युवक आघाडीचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी युवक आघाडीचे मनःपूर्वक आभार मानत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक ऐक्य, प्रेमभावना व परस्पर सन्मानाची भावना दृढ होते असे सांगितले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!