Author: नवमत

कळंबमध्ये युवासेनेच्या नव्या नेतृत्वाची निवड; निर्भय घुले आणि आसिफ बागवान यांच्यावर नवी जबाबदारी

कळंब येथे झालेल्या युवासेनेच्या बैठकीत निर्भय घुले यांची उपशहर प्रमुखपदी तर आसिफ बागवान यांची शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख मनोहर धोंगडे यांच्या हस्ते ही निवड पार पडली.

फरीद नगर व अशोक नगर येथील वीज पोलांमुळे धोका वाढला; नागरिकांची महावितरणकडे निवेदन देत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी

कळंब तालुक्यातील अशोक नगर व फरीद नगर येथे घराजवळून गेलेल्या धोकादायक वीज पोलांबाबत नागरिकांनी महावितरणकडे निवेदन दिले असून, त्वरीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे

बाबा नगर जलमय! मंदिराचा रस्ता डुबला, नागरिक संतप्त – बोट सोडून आंदोलनाचा इशारा!

बाबा नगरमधील सिद्धिविनायक आणि देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर १-२ फूट पाणी साचले आहे. नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

“राजकीय कुरघोडीत जनता भरडू नये!” — आमदार कैलास पाटील यांची अधिकाऱ्यांना खडसावणारी सूचना

धाराशिव शहरातील नागरी समस्यांचा आढावा घेताना आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, राजकीय कुरघोडीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये. रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, गटारसफाई यासारख्या सेवांमध्ये हलगर्जीपणा…

श्रावण सोमवारचे पवित्र पर्व; महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

श्रावण सोमवारच्या दिवशी महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मंदिरात गर्दी केली. अभिषेक, उपवास, व्रत आणि भक्तिभावाने वातावरण पावन झाले.

डिकसळ (इस्लामपुरा) मध्ये ₹७० लाखांच्या निधीतून पायाभूत सुविधा – शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश

डिकसळ (इस्लामपुरा) येथे राज्य शासनाच्या ₹७० लाख निधीतून रस्ते, संरक्षण भिंत व पावर ब्लॉकसारखी पायाभूत कामे पूर्ण; शिवसेनेचे नेते अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश.

जलसंधारण शेतकऱ्यांसाठी वरदान: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना दुष्काळमुक्तीचा प्रभावी उपाय

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना धरणांतील गाळ उपसून शेतजमिनींवर टाकून जलसाठा वाढवते आणि शेती सुपीक करते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना एक प्रभावी उपाय ठरतो आहे.

मॅंचेस्टर कसोटी अनिर्णित – भारताचा शौर्यपूर्ण बचाव, मालिका अजूनही जिवंत

भारत-इंग्लंड मॅंचेस्टर कसोटी अनिर्णित ठरली. शुबमन गिल, जाडेजा आणि सुंदर यांच्या शतकांमुळे भारताने सामना वाचवला. मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे.

वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भावुक; “२०० दिवसात दोनदा मरता मरता वाचलो”

ठाण्यात झालेल्या वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात माजी मंत्री धनंजय मुंडे भावुक झाले. "त्या दोनशे दिवसांत दोनदा मरता-मरता वाचलो," असे त्यांनी सांगत गेल्या काही महिन्यांतील मीडिया ट्रायल आणि वैयक्तिक संघर्ष उलगडले.…

लोकशाहीचा खरा चेहरा – स्थानिक स्वराज्य संस्था

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा खरा चेहरा. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदांपर्यंतच्या संस्थांमुळे सामान्य नागरिकांना थेट सत्तेत सहभागी होता येते. या लेखात आपण या संस्थांचे महत्त्व, अडचणी आणि भविष्यातील दिशा यावर विचार…

error: Content is protected !!