बालाजी गायकवाड यांना ‘समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ जाहीर!
दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा; संपूर्ण समाजासाठी अभिमानाचा क्षण
कळंब (प्रतिनिधी): लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव आणि मातंग समाजाचे प्रेरणास्तंभ बालाजी गायकवाड यांना ‘समाज गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ जाहीर झाला असून, हा पुरस्कार ५ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीतील नविन महाराष्ट्र सदन येथे प्रदान करण्यात येणार आहे.
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती समिती, नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार बालाजी गायकवाड यांच्या सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणार असून, केंद्रीय मंत्री आणि देशभरातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
समाजहितासाठी दिलेला मोठा योगदान
बालाजी गायकवाड यांनी आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे कार्य सातत्याने केले आहे. समाज संघटन, शैक्षणिक जागृती, युवकांचे सक्षमीकरण, आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला आहे.
हा पुरस्कार केवळ एक वैयक्तिक गौरव नसून, त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे जाणाऱ्या हजारो युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
समाजाच्या अस्मितेचा सन्मान
गायकवाड यांना मिळणारा हा पुरस्कार समाजाच्या अस्मिता, अस्तित्व आणि सन्मानाच्या लढ्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल आहे. त्यांच्या नेतृत्वाने समाजात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा
- दिनांक: ५ ऑगस्ट २०२५
- स्थळ: नविन महाराष्ट्र सदन, इंडिया गेट, नवी दिल्ली
- विशेष उपस्थिती: विविध केंद्रीय मंत्री, सामाजिक कार्यकर्ते, आणि साहित्यिक मान्यवर