डिकसळ (ता. कळंब, जि. धाराशिव):
सन २०२४–२५ मध्ये राज्य शासनाच्या अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या ₹७० लाख निधीतून मौजे डिकसळ (इस्लामपुरा) येथे महत्त्वाची विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.
या कामांसाठी शिवसेनेचे नेते मा. अजित दादा पिंगळे यांनी पुढाकार घेतला. तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते आणि डिकसळचे माजी सरपंच अमजद मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी झाली.
पूर्ण झालेली विकासकामे (₹१० लाख प्रत्येकी) :
1. रफीक शेख ते वहाब मनियार – सिमेंट काँक्रिट रस्ता
2. मोहम्मदीया मस्जिद ते अस्सलम तांबोळी – सिमेंट काँक्रिट रस्ता
3. इम्रान शेख ते नसीर मोमीन – सिमेंट काँक्रिट रस्ता
4. युसुब सय्यद ते अमजद मिर्जा – सिमेंट काँक्रिट रस्ता
5. मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता
6. कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे
7. मक्का मस्जिदजवळ पावर ब्लॉक उभारणी
एकूण खर्च: ₹७० लाख
इस्लामपुरा परिसरात झालेला सकारात्मक बदल
- दळणवळण सुलभ झाले
- सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारल्या
- धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवेश सुलभ झाला
- कब्रस्तान परिसराची सुरक्षितता वाढली
स्थानिक नागरिकांनी कामांचे स्वागत केले असून, शिवसेनेच्या लोकाभिमुख दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे.
ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणतात:
“या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे,”
– इम्रान मुल्ला, मोबीन मनियार, सौ. इर्शाद रफीक सय्यद
“मा. अजित दादा पिंगळे यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाला. त्यांच्या योगदानामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.”
– स्थानिक ग्रामस्थ