कळंब: इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ च्या ४१व्या “कौशिका” डिस्ट्रिक्ट असेंबलीमध्ये इनरव्हील क्लब कळंबने आपल्या प्रभावी सामाजिक कार्याच्या जोरावर विविध पुरस्कारांची कमाई करत एक वेगळं स्थान निर्माण केलं. हे अधिवेशन पुणे येथे पार पडलं.

माजी प्रांतीय अध्यक्षा डॉ. शोभना पालेकर यांच्या हस्ते क्लबचा सन्मान करण्यात आला. क्लबच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा बाळकृष्ण भवर (गांगर्डे) यांना अप्रतिम कार्यासाठी वैयक्तिक ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

सेवाभावी प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी

सन २०२४–२५ मध्ये क्लबने ६६ सामाजिक प्रकल्प राबवले, ज्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. हे प्रकल्प विविध क्षेत्रात राबवण्यात आले:

  • बाल आणि युवक विकास
  • महिला सशक्तीकरण
  • मातृ आणि बालसंवर्धन
  • जागतिक पर्यावरण प्रकल्प
  • सर्वाइकल कॅन्सर लसीकरण जनजागृती
  • हॅपी स्कूल उपक्रम
  • डिजिटल व सायबर जनजागृती
  • अनाथाश्रम दत्तक योजना
  • वैद्यकीय सेवा व आरोग्य शिबिरे

मान्यताप्राप्त पुरस्कार व प्रमाणपत्रे

डिस्ट्रिक्ट ३१३ मधील एकूण ७६ क्लब्सपैकी, इनरव्हील क्लब कळंबने खालील प्रमुख पुरस्कार पटकावले:

  • मानवता स्पंदन
  • सेवा विस्तार
  • अद्वितीय प्रकल्प
  • सर्वोत्तम चालू प्रकल्प
  • १०१ शगुन प्रकल्प
  • आयआयएलएम दिशा प्रोजेक्ट
  • ब्रँडिंग व इमेज बिल्डिंग
  • सर्वांगीण उत्कृष्टता पुरस्कार
  • मैत्री व सांस्कृतिक उपक्रम

याशिवाय क्लबला सर्वांगीण उत्कृष्टता प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले.

या अधिवेशनात क्लबकडून सचिव डॉ. दिपाली लोंढे, ISO सौ. दिपाली कुलकर्णी, कोषाध्यक्ष सौ. पूर्वा पोरे, CC सौ. संगिता घुले, माजी अध्यक्षा डॉ. मीनाक्षी भवर (शिंदे),सदस्या सौ. निता देवडा मान्यवर सदस्य उपस्थित होते.

क्लबच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा भवर म्हणाल्या:

“माझा कार्यकाळ अत्यंत समाधानी राहिला आहे. सर्वांच्या सहकार्याने आम्ही ६६ प्रकल्प राबवले. त्यांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्यात आम्हाला यश आले. आगामी वर्षात नूतन कार्यकारिणीसह आणखी प्रभावी कामगिरी करण्याचा संकल्प मी करत आहे.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!