कळंब येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक तयारी बैठक संपन्न
कळंब (प्रतिनिधी): नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कळंब शहरात निवडणूक तयारी बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्करदादा खोसे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे, कार्याध्यक्ष अॅड. प्रवीण यादव, महिला जिल्हाध्यक्ष सरलाताई खोसे, तसेच युवक तालुकाध्यक्ष अमर मडके उपस्थित होते.
ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दत्तात्रय तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी नगरपरिषदेतील होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली. उपस्थित मान्यवरांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला.
बैठकीत पक्षाने नगरपरिषदेच्या सर्व २० जागा आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. तसेच ओबीसी आरक्षित जागांवर ओबीसी समाजातील पात्र उमेदवारांना संधी देण्याचा निर्धार करण्यात आला. शहराध्यक्ष दत्तात्रय तनपुरे यांनीही नगरपरिषदेतील ओबीसी आरक्षित जागांवर ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी युवक शहराध्यक्ष विक्रम चोंदे, युवक प्रदेश चिटणीस शंतनू खंदारे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल, युवक शहर उपाध्यक्ष अभिजीत हौसलमल, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मुस्तफा शेख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष सोहेल शेख, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नितीन ठानअंबिर, अनिशुद्दीन काझी, तसेच अभिजीत कदम, हमीद भाई खान, रंजीत घुले, अशोक ईके, खंडू निंगोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणाबरोबरच आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहून पक्षाचा झेंडा नगरपरिषदेवर फडकविण्याचे आवाहन करण्यात आले.
