कळंबस्थानिक बातम्या

उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल बिक्कड सर मित्र परिवाराकडून मधुकर तोडकर यांचा सत्कार

कळंब (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून हासेगाव (केज), ता. कळंब येथील श्री. मधुकर प्रल्हाद तोडकर यांची निवड उपशिक्षणाधिकारी (वर्ग-२) या पदावर झाली आहे. या यशाबद्दल बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ, स्व. गणपतराव कथले युवक आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब कथले, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, उद्योजक विठ्ठल माने, साहित्य परिषदेचे अध्यक्ष परमेश्वर पालकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल यादव, शिवव्याख्याते महादेव खराटे, मुख्याध्यापक निशिकांत आडसूळ, सहशिक्षक अविनाश खरडकर, जनार्दन धुमाळे, प्रदीप रोटे, ऋषीकुमार साबळे, संजय तांबारे, औषध निर्माता अधिकारी बाळासाहेब मोराळे, व्यापारी सचिन गपाट आणि अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ यांनी सध्याच्या स्पर्धेच्या युगात कळंबच्या भूमिपुत्राने मिळवलेल्या यशाचे कौतुक केले. उद्योजक विठ्ठल माने, मुख्याध्यापक परमेश्वर पालकर, अनिल यादव आणि बाळासाहेब कथले यांनीही आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

श्री. मधुकर तोडकर यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेतून शिक्षण विस्तार अधिकारी पदावर त्यांची निवड झाली. सध्या ते बीट तेर, ता. जि. धाराशिव येथे कार्यरत आहेत. यापूर्वी ते कळंब पंचायत समितीत शिक्षण विस्तार अधिकारी व प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे.

सत्काराला उत्तर देताना श्री. तोडकर म्हणाले, “हे यश मी माझ्या आई-वडिलांच्या चरणी अर्पण करतो. माणसाने आयुष्यभर शिकत राहिले पाहिजे.”

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले. सूत्रसंचालन महादेव खराटे यांनी केले तर आभार प्रदर्शन निशिकांत आडसूळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!