हाच खरा बदलाचा मार्ग – मुलांच्या मोबाईल व्यसनावर उपाय
पूर्वीच्या काळी किती ती छात्र संयमाची असायची. परीक्षा कशा किलबिलाट करून द्यायच्या, एकत्र खेळायचे, मैत्री जपायची, पण आता… बदल झालाय!
आजची बालपणाची दुनिया मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकली आहे. मैदानात धावणारी पावलं आता स्क्रीनवरच्या गेममध्ये धावतात. सोशल मीडियावरचे फॉलोअर्स, लाईक्स, कमेंट्स मिळवण्यासाठी मुलं वास्तवापासून दूर जात आहेत. यामुळेच त्यांच्या वागणुकीत बदल दिसतोय आणि त्यांचं मानसिक, शारीरिक आरोग्य धोक्यात आलं आहे.
मोबाईलचे व्यसन – ‘स्क्रीन ॲडिक्शन’
पालकांच्या हातात नेहमी मोबाईल, मग मुलांच्या हातात नसेल तर नवल काय? शिक्षणाच्या नावाखाली ऑनलाइन क्लासेस, पण त्याचसोबत गेम्स आणि सोशल मीडिया यांचा ओढा वाढला आहे. सतत स्क्रीनसमोर बसण्याने दृष्टी कमजोर होते, मेंदूची कार्यक्षमता कमी होते, लक्ष केंद्रीत होणं अवघड जातं आणि एकटेपण वाढतं.
सामाजिक जीवनावर परिणाम
मोबाईलमुळे मुलांच्या मित्रमैत्रिणींचा वावर फक्त ऑनलाईन राहिला आहे. प्रत्यक्ष भेटी-गाठी कमी होत आहेत. त्यामुळे संवादकौशल्य, सहकार्यभाव, सामाजिक भान हरवतंय. काही वेळा तर मुलं सायबर गुन्ह्यांमध्येही अडकतात.
पालकांनी काय करावे?
- मुलांसोबत जास्त वेळ घालवा.
- त्यांच्या मित्रपरिवाराचा परिचय ठेवा.
- अभ्यास, खेळ, चित्रकला, संगीत यांसारख्या उपक्रमात भाग घेण्यास प्रवृत्त करा.
- सांस्कृतिक आणि शारीरिक विकासासाठी गाणी, नृत्य, खेळ प्रोत्साहित करा.
- समाजातील चांगल्या गोष्टींची उदाहरणं द्या.
- एकत्र जेवण, चर्चा आणि कौटुंबिक कार्यक्रम यासाठी वेळ ठेवा.
- मुलांच्या मोबाईलवर Parental Control ठेवा.
- संवादकौशल्य वाढवण्यासाठी सामूहिक उपक्रम राबवा.
- पुस्तकांची सवय लावा आणि समाजातील सकारात्मक कार्यासाठी प्रेरित करा.
मोबाईल वापर आवश्यक आहे, पण मर्यादेत. त्याचा उद्देश शिक्षण, माहिती, संवाद या साठी असावा. मुलांमध्ये संवेदनशीलता, जबाबदारीची भावना आणि वास्तवाशी जोडलेपण टिकून राहण्यासाठी पालक, शिक्षक, समाज सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
लेखिका: बालिका गाडेकर
