साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची निर्दोष मुक्तता
2008 च्या मालेगाव स्फोट प्रकरणात भाजप नेत्या आणि माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सर्व 7 आरोपींना विशेष NIA न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, या प्रकरणात आरोप सिद्ध होण्यासाठी कोणतेही ठोस आणि विश्वसनीय पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात आले.
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, “हे हिंदुत्व आणि भगव्याचं विजय आहे. सत्य शेवटी जिंकलं.” दरम्यान, भाजप नेत्या उमा भारती यांनीही आनंद व्यक्त करत भोपालमध्ये फटाके फोडले.
तथापि, AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि पीडितांना न्याय न मिळाल्याचं सांगितलं.
2008 मध्ये मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात 6 जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणाचा न्यायालयीन खटला 17 वर्षे सुरू होता.