नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव भव्य शोभायात्रेतून साजरा
भक्तिमय वातावरणात कीर्तन-प्रवचन, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांचा सत्कार व महाप्रसादाने सोहळा अविस्मरणीय
कळंब (प्रतिनिधी): कळंब शहरात नाभिक समाजाच्या वतीने संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातून काढलेल्या दिंडीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले. शोभायात्रेची सांगता संत सेना महाराज मंदिरात करण्यात आली.
कीर्तन व प्रवचनांनी भाविक मंत्रमुग्ध
मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमात ह.भ.प. अण्णासाहेब बोधले महाराज (डिकसळ) यांनी संत सेना महाराजांचे जीवनचरित्र ते समाधीपर्यंतचा प्रवास कीर्तनरूपी सादर केला. तर ह.भ.प. बलभीम धाकतोडे महाराज यांनी प्रेरणादायी प्रवचन दिले. यामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
विष्णू मंडाळे, बापूराव सुरवसे, प्रेमचंद गोरे आणि सौ. रेखाताई झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमात समाजातील लोकांसाठी डॉ. भागवत राऊत यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. तसेच राहुल देवळकर यांच्या वतीने भाविकांना औषधांचे वाटप करण्यात आले. समाजातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
महाप्रसाद व कार्यकर्त्यांचे योगदान
श्री ज्ञानेश्वर पंडित यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष प्रमोद करवलकर, मुन्ना काळे, गोकुळ मंडाळे, रेखाताई झांबरे, आबासाहेब मंडाळे, दशरथ मंडाळे, शशिकांत गायकवाड, हरि मंडळ, महादेव धाकतोडे, अशोक मंडाळे, महेश सुरवसे, अक्षय मंडाळे, रामेश्वर पौळ, युवराज पंडित, महेश काळे, सुरज मंडाळे, योगेश करवलकर, धनु पंडित, सिद्धू डिगे, जीवन मंडाळे, शरद पवार, विनायक माने, परमेश्वर धाकतोडे, अच्युत पौळ, दिलीप सुरवसे आदींनी विशेष योगदान दिले.
या भव्य सोहळ्यामुळे संत परंपरेचे महत्व अधोरेखित झाले असून समाजातील ऐक्य व भक्तिभाव अधिक दृढ झाल्याचे सर्वत्र दिसून आले.
