वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंडे भावुक; “२०० दिवसात दोनदा मरता मरता वाचलो”
ठाण्यात झालेल्या वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात माजी मंत्री धनंजय मुंडे भावुक झाले. “त्या दोनशे दिवसांत दोनदा मरता-मरता वाचलो,” असे त्यांनी सांगत गेल्या काही महिन्यांतील मीडिया ट्रायल आणि वैयक्तिक संघर्ष उलगडले. एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोष देणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उच्च न्यायालयाकडून मिळालेला दिलासा आणि विरोधकांना दिलेल्या सूचक इशाऱ्याने कार्यक्रमात उर्जा संचारली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्याकडूनही त्यांना राजकीय पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले.
Read More