कळंब (प्रतिनिधी): युवासेना कळंब शहरातील संघटनात्मक मजबुतीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कळंब येथील विश्रामगृहात पार पडलेल्या एका विशेष बैठकीत युवासेना जिल्हाप्रमुख मनोहर आबा धोंगडे यांच्या हस्ते ही नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमात निर्भय घुले यांची युवासेना कळंब उपशहर प्रमुख म्हणून निवड झाली असून, आसिफ बागवान यांना शहर संघटक या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या निवडी प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये युवासेना उपजिल्हाप्रमुख संदीप दादा पालकर, विधानसभा प्रमुख अमृत काका जाधव, विधानसभा समन्वयक गोविंद आबा चौधरी यांचा समावेश होता. तसेच परिसरातील अनेक युवा कार्यकर्ते आणि युवासैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख मनोहर धोंगडे यांनी सांगितले की, “युवासेनेचा विस्तार व संघटनात्मक बळकटीसाठी नव्या पिढीतील दमदार नेतृत्वाची निवड ही काळाची गरज आहे. कळंब शहरातील युवकांचा सशक्त सहभाग हे आमचे बलस्थान आहे.”

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. आगामी काळात नव्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनेच्या कार्यात गती येईल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!